१९४८च्या ‘पोलीस ॲक्शन’चे ध्रुवीकरण केले जात आहे. या काळातली जातीय सलोख्याचीही कितीतरी उदाहरणे आहेत. ती उजागर करण्याची गरज आहे!
‘पोलीस ॲक्शन’च्या शोकांतिकेला राजकारणी आणि इतर संधीसाधू राजकीय निवडणुकीसाठीचे साधन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे या घटनेकडे गंभीरपणे पाहणे महत्त्वाचे ठरते. १९४८ची ही घटना जनमानसात लोकप्रिय असलेल्या प्रतिमेपेक्षा प्रत्यक्षात प्रचंड गुंतागुंतीची होती. ‘पोलीस ॲक्शन’ची घटना जात, सामाजिक वर्ग आणि इतर अस्मिता यांनी प्रभावित झालेली होती.......